Autobiography of a indian farmer in marathi

Marathi essay writing topics for educational institution students, essay topics for monstrous 10. I hope you’ll come into sight this articles related to design in Marathi on Autobiography concede Farmer or Shetakaryache Manogat. शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध लेखन हे विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे.

आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…

मी शेतकरी बोलतोय

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे असे म्हटले जाते .

कृषी हा आपल्या देशाचा आधार आहे . शेतकरी हा शेतीचा अविभाज्य भाग आहे . शेतकऱ्यावरच कृषी अवलंबून आहे . शेतकऱ्यामुळेच आपला देश समृद्ध आहे .

असे सगळेच बोलत असतात पण खरंतर शेतकरी म्हटलं कि सगळ्यांच्या डोळ्यांसमोर येते ती गरिबी, कर्जबाजारी, दुष्काळ, आत्महत्या करणारा शेतकरी !

हो, खरं आहे हे सगळं ! पण या सगळ्याला फक्त शेतकरीच जबाबदार आहे का ? अशी वेळ आम्हा शेतकऱ्यांवर का आणि कशी निर्माण झाली ? याचा शोध घेण्याचा कधी कोणी प्रयत्न केला का?

"जय जवान ,जय किसान" असं श्री लाल बहादुर शास्त्री म्हणाले होते.

पण आज याच शेतकऱ्याची व्यथा एकूण तुमचे मन दु:खी झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याला तुम्ही जगाचा पोशिंदा मानता त्या जगाच्या पोशिन्द्याला आज आत्महत्या करण्याची वेळ का आली?

मी स्वतः एक शेतकरी आहे.

Koji matsushita biography of william shakespeare

मी रोज सकाळी लवकर उठतो. आपला नांगर आणि बैल घेतो आणि शेतावर जातो. मी संपूर्ण दिवस शेतात माझ्या पत्नी आणि मुलांसोबत काम करत असतो .

कडक उन्हात आम्ही सगळेजण कष्ट करतो. स्वतः दिवस रात्र शेतात राबून प्रेमाने, मनापासून संपूर्ण बळ एकवटून पिक घेतो. कधी दुष्काळ, कधी अतीवृष्टी, ही निसर्गनिर्मित संकटे आमच्यापुढे कायम आ वासून उभे राहतात तरी आम्ही डगमगत नाही.

मी नेहमी सह्याद्रीच्या शिखराप्रमाणे कणखर उभा असतो, या संकटावर मात करून आम्ही मायेने लावलेले, जपलेले पिक घेतो.

शेती हा व्यवसाय पावसावर मुख्यतः हवामानावर अवलंबून आहे.

भारतात मोठ्याप्रमाणावर शेती ही पावसावर अवलंबून आहे त्यामुळे पाऊस कमी किंवा जास्त पडल्यास त्याचा परिणाम शेतीवर होतो तसेच पाऊस वेळेवर न आल्यास सुद्धा त्याचे दुष्परिणाम शेतीवर होतात .

त्यात अजून भर म्हणजे शेतमालाला हमीभाव नाही. आम्ही घेतलेल्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. या अवस्थेत आम्ही शेतकरी करणार तरी काय ?

अशा वेळी आम्हा शेतकऱ्यांची अपेक्षा सरकारकडून अनुदान , कर्जमाफीची असते. अशा बिकट परिस्थितीत ही जर सरकारने आम्हाला मदत नाही केली की मग आम्ही कर्जबाजारी होतो आणि नैराश्यातून भलताच मार्ग निवडतो.

मीसुद्धा या सगळ्या चक्रातून गेलो आहे .

आज देशातील बहुतांश शेतकऱ्यांची अशीच अवस्था आहे. पण मला माझ्या कुटुंबाचं पाठबळ आहे म्हणून मी अजूनही तग धरून खंबीरपणे उभा आहे .

आता हळू हळू माझी परिस्थिती बदलत आहे . शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मी गायी म्हशींचे संगोपन करत आहे .

Antonio horta osorio biography of william

त्यामुळे मला दिवसाला वीस पंचवीस लिटर दूध मिळते आणि यापासून मी दैनंदिन जीवन जगण्यासाठी काही प्रमाणात उदरनिर्वाहासाठी त्याची विक्री करून पैसे मिळवतो.

त्यातून माझा घर खर्च भागतो . नफा मिळालेल्या पैशांतून मी शेतीसाठी भांडवल खरेदी केले आहे .

भांडवल असल्यामुळे मला यांत्रिकीकरण करता आले आहे.

मी एक छोटा ट्रॅक्टर विकत घेतला आहे . तसेच विहीर खणून ठिबक सिंचनही करून घेतले आहे. पाण्याचे योग्य नियोजन केले आहे. आता मला वर्षातून दोन वेळा पीक घेता येते .

माझी मिळकत दुप्पट झाली आहे. घराचा आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च सुटला आहे . मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पैशांची सोय झाली आहे.

शेतकऱ्यांची परिस्थिती बदलण्यास आपले सरकार प्रयत्नशील आहेतच .आपणही ही सर्व परिस्थिती बदलण्यास त्यांचे सहकार्य केले पाहिजे .

सरकारद्वारे दिल्या गेलेल्या गोष्टींचा फायदा घेऊन आपणही चांगले नियोजन केले पाहिजे. तरच देशाची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि आपल्या भारत देशाची विकसनशील देशापासून विकसित देश बनण्याची वाटचाल सुरु होईल.







Written by Priyanka Kumbhar